…त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल – उद्धव ठाकरे

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात ‘मराठी भाषा दिन’ कार्यक्रमात मराठी भाषेची परंपर, संस्कृती, वारसा आणि जतन यावर भाष्य केलं. तसेच ‘भाषा संस्कारांतून जन्माला येते. जिजाऊंचे संस्कार असलेली आपली मराठी भाषा आहे. ही शक्ती आणि भक्तीची भाषा आहे. चिंतीत भावनेनं मराठी भाषा दिन साजरा करू नका,” असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं.

तसेच या कार्यक्रमाला देवेंद्रजीही उपस्थित आहेत, सर्वपक्ष एकत्र येऊन आपल्या आईचा सन्मान करत आहेत याचा मला आनंद असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार करणाऱ्या जिजाऊंची भाषा ही मराठी आहे. ज्या संस्कारातून स्वराज्य उभारलं तीच भाषा मराठी आहे. अशी आपली मराठी भाषा असल्याचे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.

Loading...

या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोला लगावला आहे. बुधवारी जेव्हा विधान परिषदेत मराठी भाषा सक्तीचं विधेयक मंजूर झालं त्या वेळी सभागृहात शांतता होती. त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल. हे सांगताना मला कुणाचा अपमान करायचा नाही असा टोलाही त्यांनी फडणवीसांना लगावला.

विधिमंडळात भाजपकडून सत्ताधारी शिवसेनेला कायम कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. वीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपने त्यांचा गौरव करणारा प्रस्ताव विधिमंडळात आणला होता. मात्र तो फेटाळला गेला. त्यावरून सभागृहात गदारोळ झाला होता. फडणवीस हे शिवसेनेला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हा टोला लगावला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका