मराठी चित्रपटांचे चित्रीकरण सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान

udhav thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोनामुळे येणाऱ्या समस्यांच्या अनुषंगाने मराठी चित्रपट निर्माते, नाट्य व मालिका निर्माते, कलाकार यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी सर्वांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या प्रयत्नांत आमची साथ राहील याची ग्वाही दिली.

शारीरिक अंतर व इतर नियमांचे काटेकोर पालन करीत मर्यादित प्रमाणात चित्रीकरण किंवा निर्मिती नंतरच्या प्रक्रिया सुरु करता येतील का याबाबत निश्चित असा कृती आराखडा दिल्यास त्यावर विचार करता येईल असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री ‘मातोश्री’ निवासस्थानातून बाहेर पडायलाच तयार नाहीत; पाटलांचा CM ठाकरेंना टोला

ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये दक्षता घेऊन व सर्व नियम पाळून मर्यादित स्वरूपात का होईना, चित्रीकरण सुरु करता येईल का याचा विचार करता येईल पण त्यासाठी कंटेनमेंट झोन्समध्ये चित्रीकरण स्थळे नाहीत ना, तसेच चित्रीकरण पथकातील लोकांची संख्या, त्यांचे राहणे-जेवणे या गोष्टीदेखील पाहाव्या लागतील.

मनोरंजन क्षेत्र हे केवळ करमणूक करणारे नाही तर लोक त्यांचे अनुकरण करतात, त्यांच्यापासून शिकतात त्यामुळे या क्षेत्राचे महत्व आहे. नाट्य आणि चित्रपटगृहे ही सार्वजनिकरीत्या एकत्र येण्याची ठिकाणे असल्याने तिथे लगेच परवानगी देता येईल असे वाटत नाही असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

कौतुकास्पद : शिवसेनेचा ‘हा’ खासदार ठरला क्वारंटीनसाठी स्वत:चे घर देणारा देशातील पहिले खासदार