उद्धव ठाकरे – अजित पवारांची महत्त्वपूर्ण बैठक संपली, महत्वाच्या विषयावर चर्चा

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये सुरु असणारी बैठक संपली आहे. या बैठकीमध्ये अनलॉक २ संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचं कळतय. बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे ही बैठक पार पडली. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये राज्याचे आर्थिक नियोजन करण्यासंदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती कळतेय.

मग धनंजय मुंडेंची दोन वेळा कोरोना टेस्ट का?, किरीट सोमय्यांचा सवाल

सरकारचे पुढील निर्णय आणि नियोजन संदर्भात ठाकरे – पवार बैठक झाल्याचं बोलले जात आहे. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी देखील आज सकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यामुळे राज्यामध्ये सुरु असणाऱ्या राजकारणावर देखील बैठकीत चर्चा होत असल्याचं दिसत आहे.

कसे घेतात विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण मुख्यमंत्र्यांनी पाहिले प्रात्यक्षिक

दरम्यान, या भेटीपूर्वी राज्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या विषयी शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती. यावेळी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांवर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितले आहे.

तुकाराम मुंढेंवर २० कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप, पोलिसांत तक्रार दाखल

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे मंजूर केलेल्या निधीचं वितरण करणे, अंशत: अनुदानित शाळांना प्रचलित धोरणाप्रमाणे टप्पा देण्याचा शासननिर्णय जारी करणे, कनिष्ठ महाविद्यालयातील वाढीव पदांना अनुदानासह मान्यता देणे, अघोषितला घोषित करुन अनुदान देणे आदी मुद्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असून या मुद्यांवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचार करुन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.