‘नमस्कार! पुन्हा एकदा तुम्हाला घरी बसवणारा, तुम्हाला घरातून बाहेर पडू न देणारा व्यक्ती तुमच्या समोर’

टीम महाराष्ट्र देशा – देशभरात आणि महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या फैलावाला अटकाव घालण्यासाठी सरकारकडून सक्तीचं लॉक डाऊन जाहीर करण्यात आल आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे राज्याला रोजच्या रोज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संबोधित करत असतात.

आजही मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला संबोधित केलं आहे. आपल्या संवादाची सुरुवात त्यांनी काहीशा मिश्कील अंदाजात केली. पुन्हा एकदा तुम्हाला घरी बसवणारा, किंवा तुम्हाला घरातून बाहेर पडू न देणारा वा तसं सांगणारा व्यक्ती तुमच्या समोर आला आहे असे बोलून त्यांनी बोलायला सुरुवात केली.

ठाकरे यांनी नागरिकांना गर्दी करू नका तसेच आवश्यक गोष्टीचा साठा मुबलक आहे त्यामुळे दुकानांमध्ये अनावश्यक गर्दी करू नका. हा टप्पा महत्वाचा आहे या काळात हा विषाणू गुणाकार करतो, परंतु आपण काळजी घेतली तर या काळातच आपण त्याची वजाबाकी करून टाकू असं विश्वास त्यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी पोलीस आणि डॉक्टर आणि मेडिकल स्टाफचे कौतुक आणि आभार मानले. डॉक्टर्स बरोबर बोलून आपला आत्मविश्वास दुनावल्याचही त्यांनी सांगीतल.

तसेच खाजगी वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर्सना त्यांनी आवाहन केलं आहे कि न्यूमोनिया सारख्या आजाराची लक्षणं दिसल्यास त्वरित कोरोना दवाखान्याला कळवण्यात यावं. आपण सगळे मिळून हे संकट परतवून लावू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही पहा –