संपूर्ण महाराष्ट्रात नाईट लाईफ सुरु होणार? CM ठाकरे, म्हणाले…

टीम महाराष्ट्र देशा : येत्या 26 जानेवारीपासून मुंबईतील नरीमन पॉईंट, बीकेसी, काला घोडा आणि मिल कंपाऊड भागात याची अमंलबजावणी सुरू होणार आहे. मुंबईत आता मर्यादीत आणि अरहिवासी भागात हाँटल, मॉल्स आणि थिएटर 24 तास खुले रहाणार आहेत, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला, शहराला विशिष्ट असा इतिहास आणि संस्कृती आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ‘नाईट लाईफ’ सुरु करता येणार नाही. मुंबईतील काही भागांमध्येच नाईट लाईफ सुरु करण्यात येत असून ते फक्त प्रायोगिक तत्वावर असणार आहे. खरंतर मला नाईट लाईफ हा शब्दच आवडत नाही,’ असे ठाकरे म्हणाले.

Loading...

मुंबई येथे आयपीएस अधिकाऱ्यांच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, ‘मला नाईट लाईफ हा शब्दच मुळात आवडत नाही, पण तरीही मुंबईच्या काही भागांमध्ये प्रायोगिक तत्वावर आपण हा प्रयोग करुन पाहणार आहोत”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, नोकरी करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने मुंबईमध्ये ‘नाइट लाइफ’ सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू आहे. त्याचप्रमाणे प्रस्ताव आल्यास पुण्यातदेखील ‘नाइट लाइफ’बाबत विचार करू, असे आश्वासन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी दिले.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'