काहीही झालं तरी शैक्षणिक वर्षं वाया जाऊ देणार नाही ! CM ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय

thackeray

मुंबई : कोरोनाचा फटका हा सर्वच क्षेत्रांना बसला आहे. त्यात शैक्षणिक क्षेत्र देखील भरडले गेले आहे. अनेक नियोजित परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर काहींचे शैक्षणिक वर्ष हे अर्ध्यावरच थांबले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही निर्णय घेतले आहेत. तर यासंबंधीचे आदेश वरीष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.

शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासाठी शालेय शिक्षण तसेच उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचा मुख्यमंत्री ठाकरे यांनी Video Conferencing च्या माध्यमातून आढावा घेतला. या बैठकीत मुख्य सचिव अजोय मेहता, शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय आणि इतर वरीष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

ते म्हणाले की, Covid-19 च्या साथीमुळे जागतिक स्तरावर शैक्षणिक क्षेत्रात बदल होऊ शकतात. कुठल्याही परिस्थितीत शैक्षणिक वर्ष वाया घालवता येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आपल्याकडेही नियमित शैक्षणिक वर्ष सुरु होईल अशा रीतीने शिक्षण पद्धतीबाबत सर्वंकष आराखडा तयार करण्यात येणार आहे.

तंत्रज्ञानाचा वापर करा…

शाळा सुरू झाल्या नाहीत. तरीही शिक्षण सुरूच राहील. शैक्षणिक वर्षं वाया जाऊ देणार नाही, अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिक्षण आणि माहिती व तंत्रज्ञान तज्ज्ञांच्या चर्चेतून नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. ग्रामीण आणि शहरी भागांसाठी व्हर्च्युअल क्लासरूम्स, ई-लर्निंग, डिजिटल पर्यांयाचा विचार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सामावून घेणारी प्रणाली विकसित करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ठाकरे म्हणाले की, शाळा सुरू होणार नाहीत. पण शिक्षण सुरूच राहील, असं नियोजन करणं आवश्यक आहे.