नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या प्रश्नांची उत्तर द्या, अन्यथा पाठींबा मिळणार नाही : उद्धव ठाकरे

udhav thackeray

टीम महाराष्ट्र देशा : नागरिकत्व सुधारणा विधेयक सोमवारी लोकसभेत तब्बल 12 तासांच्या वादळी चर्चेनंतर ३११ आणि ८०च्या फरकाने पारित झाले. यावेळी महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन केलेल्या शिवसेनेची भूमिका काय असणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मात्र शिवसनेने मोदी सरकारच्या या महत्वकांक्षी विधेयकाला पाठींबा दिला आहे. मात्र आता शिवसेनेने आपली भूमिका बदलली असल्याचं दिसत आहे. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ते म्हणाले की, नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत जोपर्यंत स्पष्टता येत नाही तोपर्यंत राज्यसभेत विधेयकाला समर्थन देणार नाही. सोमवारी शिवसेनेच्या खासादारांनी विधेयका बाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तर देण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी टाळली आहे. त्यामुळे जो पर्यंत आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तर मिळत नाहीत तो पर्यंत आम्ही पाठींबा देणार नाही.

तसेच नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध करणाऱ्यांना आणि पाठिंबा देणाऱ्यांना हे विधेयक कळलं आहे का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा या विधेयकामधील सत्यता आणि स्पष्टता लोकांसमोर मांडली पाहिजे. नव्याने नागरिकत्व मिळालेले नागरिक कोणत्या राज्यात राहणार आणि त्यांची जबाबदारी कोण घेणार? याची स्पष्टता प्रत्येक राज्याला कळली पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले.

दरम्यान देशाच्या भवितव्याचा विचार करायचा असेल तर या विधेयकावर विस्ताराने चर्चा झाली, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. देशातील नागरिकांसमोरील रोजच्या जीवनातील आवश्यक प्रश्न सोडवणं अधिक महत्त्वाचं आहे. आम्ही काय भूमिका घ्यावी, हे आम्हाला कोणी सांगू नये, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या