आपल्या राज्यात गाय म्हणजे माता आणि इतर राज्यात खाता? मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना झापलं

blank

नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यमान सरकार हे तीन चाकी रिक्षा सरकार असल्याचं म्हटलं होतं. तसंच हे सरकार फार काळ टिकणार नाही असं म्हटलं होतं. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

तुम्ही बेकार म्हणून अजब वाटले सरकार असा टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपला लगावला आहे. तसंच, हे गोरगरिबांचे सरकार आहे. आमचे सरकार रिक्षावाल्यांचे आहे, बुलेट ट्रेनवाल्यांचे नाही, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

आम्ही दिलेले वचन पाळणार, हे आमचे सरकार आहे. आम्ही चूकत होतो की धर्म आणि राजकारण एक करत होतो. पण राजकारण हे झुगार आहे आणि झुगारासारखे खेळायचे हे आम्ही विसरलो होतो. गेली २५ – ३० वर्ष आम्ही यांसोबत राहिलो. आमचे धर्मांतर झाले नाही. आम्ही आजही हिंदू आहोत. धर्म आणि राजकारण एकत्र करु नका, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आपल्याला सावरकरांचं सर्व हिंदूत्व मान्य आहे का?, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी भाजपला केला आहे.सावरकरांवरुन तुम्ही शिवसेनेवर टीका करत आहात. मात्र, तुम्हाला सावरकरांचं सर्व हिंदूत्व मान्य आहे काय? गोवंश हत्याबंदीचा कायदा सर्व देशात का लागू झाला नाही? माझ्या महाराष्ट्रात माता आणि बाजूला जाऊन खाता?, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी निशाणा साधला आहे.

गोवंश हत्याबंदीवरुन भाजपची नेमकी भूमिका काय आहे. गोवंश हत्याबंदी संपूर्ण देशात का लागू नाही. रीजिजू आणि पर्रिकर म्हणाले होते की, आमच्या येथे मोठ्या प्रमाणात गोमास खाल्ले जाते. यावर भाजपची भूमिका वेगवेगळी आहे का?, असा सवाल त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :