मुख्यमंत्री ‘उद्धव ठाकरे’ आणि कॉंग्रेस अध्यक्षा ‘सोनिया गांधी’ यांची दिल्लीत भेट

टीम महाराष्ट्र देशा – उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार घेतल्यानंतर आज प्रथमच दिल्ली दौरा केला. यावेळी त्यांनी पंतप्रधानांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांच्यासमवेत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांशी आवश्यक गोष्टींवर चर्चा झाल्याचे स्पष्ट केले.

ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये महाराष्ट्राला सहकार्य करण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले. राजकारण आपल्या ठिकाणी आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, की आवश्यक विषयांवर केंद्राचे सहकार्य मिळेल. केंद्र-राज्य समन्वयात सर्व गोष्टी आल्याचेही त्यांनी नमूद केले.

Loading...

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज्याशी संबंधित अनेक विषयावर चर्चा झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच, नरेंद्र मोदींनी राज्यातील चांगल्या गोष्टी असतील, त्यामध्ये केंद्राचे सहकार्य असेल, असे आश्वासन दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. याशिवाय, सीएए, एनसीआर याबाबतही नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

सीएएवरून कोणाला घाबरण्याची गरज नाही. एनआरसी फक्त आसाम पुरते मर्यादित असून संपूर्ण देशात लागू होणार नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी एकप्रकारे सीएएला समर्थन दिल्याचे समजते. याशिवाय, राज्यातील जीएसटी, शेतकऱ्यांच्या मुद्दयांवरही चर्चा झाल्याचे सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे.

नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांची ही पहिलीच भेट असणार आहे.

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांच्या सोबत आदित्य ठाकरे , संजय राऊत, मिलिंद नार्वेकर , तसेच कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे हेही उपस्थित होते.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया –

आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. वेगळी झाले असले तरी नातं कायम असतच. भविष्यात एकत्र येणार की नाही ते येणारा कालच ठरवेल असेही पाटील म्हणाले.

तसेच मुख्यमंत्री झाल्यानंतर जवळपास तीन महिन्यांनी पंतप्रधानांची भेट घेणारे उद्धव ठाकरे आता धाडसाने निर्णय घेताय. मुख्यमंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेच पंतप्रधानांची भेट घ्यायची प्रथा आहे. परंतु एवढ्या दिवस शरद पवार आणि कॉंग्रेसला काय वाटेल या विचारामुळे त्यांनी मोदींची भेट घेतली नसेल असाही टोला त्यांनी लगावला.

हेही पहा –

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
धक्कादायक : निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं