‘सीएम ठाकरे फक्त भाषण ठोकतात, त्याने शेतकऱ्यांचे पोट भरत नाही’

बीड : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फक्त भाषण करतात. भाषणाने शेतकऱ्यांचे पोट भरत नाही, असा हल्लाबोल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला. बीड जिल्ह्यातील गेवराई येथील शेतकरी परिषदेमध्ये बोलत होते.

ते म्हणाले, अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री फक्त भाषण करतात. भाषणाने शेतकऱ्यांचे पोट भरत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तत्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली.

लखीमपूर खेरी येथील हिंसाचारावरून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. ‘मोदी यांना खेळाडूंना भेटण्यासाठी व बोलण्यासाठी वेळ आहे. मात्र मागील अनेक दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या आणि शहीद झालेल्या शेतकऱ्यांना भेट देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, असा घणाघात शेट्टी यांनी केला.

पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारने मदत करताना गांभीर्य दाखवले नाही. विमा कंपन्या शेतकऱ्यांना फसवत आहेत. या कंपन्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे खोटे रेकॉर्ड करत आहेत. शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर करताना पैशाची मागणी करतात. पीकविमा कंपन्यांच्या माध्यमातून दरोडा टाकण्याचे काम होत आहे. मग या दरोड्यामध्ये राज्य आणि केंद्र सरकारचा हिस्सा आहे का ? असा प्रश्न राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या