रत्नागिरी : कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी परस्पर दिलेल्या कामांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्थगितीवर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सुचक वक्तव्य केलंय. दुर्गम भागातील निधी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष्य घातलंय असं सांगत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी या प्रश्नावर आजच्या पत्रकार परिषदेत सावध प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईत मनसेनी लावलेली पोस्टर्स हि फक्त आणि फक्त ड्रामेबाजी आहेत. त्यात तथ्य़ काही नाही, धमकी संदर्भात पोस्टर्स असतील तर पोलिस त्यांचा बंदोबस्त करतील. तसेच महाराष्ट्राच्या बाहेरून जर कुणी उपदव्याप केले असतील तर केंद्र सरकारने या संदर्भातील दखल घेवून बंदोबस्त करावा, असेही शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –