श्रीनिवास वनगा यांच्यासाठी भाजपचे दरवाजे कायम खुले – फडणवीस

मुंबई : पालघर पोटनिवडणुकीत भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र भाजपने पालघर निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून आयात केलेले उमेदवार राजेंद्र गावित यांनी त्यांचा पराभव केला.

bagdure

दरम्यान पालघर विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ते म्हणले की,श्रीनिवास वनगा हे जरी शिवसेनेत गेले असले,तरी त्याच्यासाठी आमचे दरवाजे कायम खुले आहेत. चिंतामण वनगा यांनी पालघरमध्ये भाजप रूजवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळं वनगांचं योगदान भाजप विसरणार नाही.

दरम्यान त्यांनी यावेळी भाजपला निवडून दिल्याबद्दल तेथील जनतेचे देखील आभार मानले आहेत. ही निवडणूक क्लेषदायक होती. मित्रांमध्येच कटुता निर्माण झाली. शिवसेनेनं ठरवलं असतं तर ही कटुता टाळत आली असती. आता निवडणूक संपली आहे त्यामुळं कटुताही विसरली जावी. असं देखील त्यांनी यावेळी म्हंटले.

You might also like
Comments
Loading...