विकास प्रकल्प पूर्ण करतानाच भूमिपूत्रांना न्याय देणार- मुख्यमंत्री

ठाणे – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई शहर व संलग्न ठाणे जिल्ह्यात दीड लाख कोटी रुपयांचे विविध पायाभूत सुविधा उभारणीचे प्रकल्प सुरु केले असून त्यातील 50 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प एकट्या ठाणे जिल्ह्यात सुरु आहेत. तथापि हे प्रकल्प पूर्ण करताना स्थानिक भूमिपूत्रांना तसेच या प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्यांना त्वरीत न्याय देऊ, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ठाणे जिल्ह्यातील मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील घणसोली तळवली उड्डाण पूल, महापे भुयारी वाहन मार्गिका व सविता केमिकल येथील उड्डाणपुल उद्घाटन, ठाणे बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ला जोडणारा रस्ता, कोपरी, ठाणे येथील रेल्वे ओलांडणी पुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते ऐरोली येथे झाले.

यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार राजन विचारे, खासदार कपील पाटील, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार सर्वश्री किसन कथोरे, प्रताप सरनाईक, संजय केळकर, सुभाष भोईर, संदीप नाईक, गणपत गायकवाड, नरेंद्र पवार, नरेंद्र पाटील, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, महानगरआयुक्त आर.ए. राजू, अति. महानगर आयुक्त प्रवीण दराडे आदी उपस्थित होते.