fbpx

‘अण्णांचे पाय धरून मुख्यमंत्र्यांनी नऊ महिन्यांची मुदत मागून घेतली’

टीम महाराष्ट्र देशा – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी निवडणूक होऊन जाईपर्यंत काही बोलू नये, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पाया पडले व 09 महिन्यांची मुदत मागून घेतली, असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

लोकपाल कायद्यासाठी कोणत्या आधारावर मुख्यमंत्र्यांनी ०९ महिन्यांचीच मुदत निश्चित केली? याचे स्पष्टीकरण द्यावे, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज नागपुरात हाणला आहे.

परिवर्तन यात्रेनिमित्त माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जयंत पाटीलही नागपुरात आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी अण्णा हजारेंच्या पाया पडून विधानसभा निवडणूक होईपर्यंत वेळ काढून घेतली, असा आरोप जयंत पाटलांनी केला आहे.

1 Comment

Click here to post a comment