Karnataka Election : सिद्धरामय्या बदामीमधून विजयी तर चामुंडेश्वरीतून पराभूत 

कर्नाटक – कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत असून, आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजप स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत आहे. भाजप ११0 कॉंग्रेस 72 तर जेडीएस 38 जागांवर आघाडीवर आहे. या निवडणुकीकडे लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहण्यात येत असल्याने दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.

दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासाठी कर्नाटकरांचा कौल धक्कादायक राहिला. सिध्दरामय्या यांचा बदामीत विजय झाला असला तरी चामुंडेश्वरीमधून त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. ते थोड्याच वेळात राजीनामा देण्याची शक्यता आहे.

आपल्या मुलासाठी सिद्धरामय्या यांनी वारुणा मतदार संघ सोडला होता आणि चामुंडेश्वरीतून निवडणूक लढवली. पण तिथून जेडीएसकडून पराभव होण्याची शक्यता गृहीत धरुन बदामीतही निवडणूक लढवली. बदामीत सिद्धरामय्यांनी भाजपचे उमेदवार बी. श्रीरीरामालू यांचा 1696 मतांनी पराभव केला. तर चामुंडेश्वरीत जेडीएसचे उमेदवार जे.टी.देवगौडा यांनी सिद्धरामयांचा 34 हजार 511 मतांनी पराभूत केलं.Loading…
Loading...