‘उदयोगधंदे सुरु होऊन बेकारी कशी कमी होईल, या बद्दल कधीतरी मुख्यमंत्र्यांनी बोलावे’

मुंबई : कोरोना काळात राज्यातील अनेक उद्योग बंद झाले आहेत. राज्यातील बेरोजगारीचा दरही वाढला आहे. अनेकांच्या हाताचा रोजगार गेला आहे. यावरुन केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या विषयी कधी बोलणार असा खोचक प्रश्न माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी उपस्थित केलाय. ही परिस्थिती कधी आणि कोण बदलणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय.

या संदर्भात राणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केलाय. ते म्हणाले की, ‘राज्यातील उदयोगधंदे बंद, हॉटेल व्यवसायासह अन्य व्यवसाय बंद, छोटे व मोठे असे सर्व व्यावसायिक आर्थिक संकटात असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याला कारण लॉकडाउन आहे आणि लॉकडाउनला सर्वस्वी जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. ही परिस्थिती कधी, कशी आणि कोण बदलणार? राज्यातील गोरगरीबांची उपासमार कधी थांबणार? उदयोगधंदे सुरु होऊन बेकारी कशी कमी होईल, याबद्दल कधीतरी मुख्यमंत्र्यांनी बोलावे.’

राज्यात दुसऱ्या लाटेमुळे राज्य सरकारला लॉकडाऊन लावावे लागले होते. या काळात अनेकांच्या हाताचे काम गेले आहे. त्यामुळे राज्य सरकारवर व्यापारी आणि उद्योजक नाराज आहेत. त्यातच भाजपच्या वतीनेही प्रश्न उपस्थित केले जाताहेत. नारायण राणे हे उद्योग मंत्री होते, त्यामुळे त्यांनीही उद्योगासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलावे, अशी मागणी केलीय.

महत्त्वाच्या बातम्या

IMP