fbpx

मुख्यमंत्र्यांनी सहकाऱ्यांचा भ्रष्टाचार लपवू नये : काँग्रेस

bjp congress logo

टीम महाराष्ट्र देशा :  गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सहकाऱ्यांचा भ्रष्टाचार लपवू नये अस विधान केले आहे. मंत्र्यांच्या स्तरावर होत असलेला मोठा भ्रष्टाचार पहावा व त्याविरुद्ध बोलावे अस मत चोडणकर यांनी व्यक्त केले आहे.

गिरीश चोडणकर यांनी सरकारी कर्मचारी नोकऱ्या विकतात असे सांगून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी लाचखोर कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाईची भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री जर खरोखर याविषयी गंभीर असतील तर आम्ही त्याचे स्वागत करतो पण मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांच्या स्तरावर होत असलेला मोठा भ्रष्टाचार पहावा व त्याविरुद्ध बोलावे, तरच लोक त्यांच्या हेतू मागिल सत्यता मान्य करतील अस वक्तव्य केले आहे.

दरम्यान, चोडणकर यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष वरद म्हादोळकर, प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांच्यासोबत पत्रकार परिषद घेत भ्रष्ट अधिकारी व मंत्र्यांवर लवकरात कारवाई करण्याची मागणी केली आहे.