fbpx

मंदसौर बलात्कार : बलात्कार करणाऱ्यांना जिवंत राहण्याचा अधिकार नाही

मंदसौर : मध्यप्रदेशातील मंदसौर येथे मंगळवारी घरी जाण्यासाठी शाळेच्या बाहेर पालकांची वाट पाहत उभ्या असलेल्या एका चिमुकलीचे अपहरण करून तिचा बलात्कार करण्यात आला होता.बलात्कारातील आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा देण्याची मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनीकेली आहे.या प्रकाराचा रस्त्यावर उतरून जनतेनं निषेध नोंदवला आहे.

दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना बलात्कारी हे भुईला भार असून त्यांना जिवंत राहाण्याचा अधिकारच नाही, असं म्हणतं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

चौहान पुढे बोलताना म्हणाले की, बलात्कार प्रकरणांचे खटले जलदगती न्यायालयात चालविले जावेत, अशी तरतूद राज्य सरकारने केली आहे. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयानेही असेच करावे, अशी विनंती राज्य सरकारने केली आहे. तसे झाल्यास बलात्कार प्रकरणांतील आरोपींची लवकरात लवकर सुनावणी होईल.पोलिसांनी आरोपीला अटक केलं असून, त्याला कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल.

सबंधित बातम्या

संतापजनक : बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना भाजप आमदारने मानायला लावले खासदाराचे आभार