ब्रेकिंग: फडणवीसांची भीष्मगर्जना, राज्यात भाजपच्याचं नेतृत्वात सरकार बनवणार

टीम महाराष्ट्र देशा: सत्तास्थापनेसाठी आम्हाला कोणत्याही फोडाफोडीची गरज पडणार नाही, आमच्यावर आमदार फोडण्याचे आरोप चुकीचे आहेत. विरोधकांनी हे सिद्ध करावं अन्यथा माफी मागावी. राज्यपालांच्या आदेशानुसार आजपासून काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करणार आहे. परंतु महाराष्ट्रातील पुढचे सरकार हे भाजपच्याच नेतृत्वात बनवणार, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

राज्यामध्ये निर्माण झालेल्या सत्ता संघर्षात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी शिवसेनेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. राज्यामध्ये १०५ जागा मिळवत जनतेने आम्हाला मोठा विजय दिला. लढलेल्या जागांपैकी ७० टक्के जागांवर आम्ही विजयी झालो आहोत. सरकार प्रामाणिकपणे चालल्याने जनतेने आम्हाला पाठींबा दिला. दुर्दैवाने अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सरकार बनवण्याचे सर्व मार्ग खुले असल्याचं’ विधान केलं. हे दुःखदायक आहे. ते असं का म्हणाले हे कळत नाही. पहिल्याच पत्रकार परिषदेत आम्ही महायुतीचेच सरकार स्थापन करू हे सांगितलं होत.

आजवर आमच्याकडून चर्चेची दार खुली होती, शिवसेनेला आमच्याशी चर्चा न करता काँग्रेस – राष्ट्रवादीशी चर्चा करायला वेळ होता. कदाचित पहिल्या दिवशी काँग्रेस – राष्ट्रवादीशी त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका कायम राहीली. भाजपसोबत चर्चाच करायची नाही हे धोरन शिवसेनेनं स्वीकारलं. भडक विधानकरून सरकार स्थापन होऊ शकत नाही. आम्हाला ऊत्तर देता येत पण तसं करणार नाही. काही लोकांनी पाहिल्या दिवसापासून जी वक्तव्य केली हि चुकीची आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा अनादर आम्ही कधीही करणार नाही. परंतु शिवसेनेने आमच्या नेत्यांवर खालच्या दर्जातून टीका केली. त्यामुळे अशा लोकांसोबत सरकार का करायचा हा आमच्यासमोर प्रश्न असल्याचं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

गेल्या पंधरा दिवसांत माध्यमातून केली जाणारी विधाने धक्कादायक आहेत. माझ्यासमोर कधीही अडीच वर्षाचा विषय झाला नाही. एकदा यावरूनच आम्ही बोलणी बंद केली होती. माझ्यासमोर कधीही हा विषय झाला नाही. म्हणूनच मी दिवाळीमध्ये अनौपचारिकपणे बोलताना असं काहीही ठरलेलं नाही असं सांगितलं. सर्व समज गैरसमज चर्चेतून संपवता आले असते. पण आम्ही चर्चाच करणार नसल्याची भूमिका मांडली . गेल्या पाच वर्षात अनेकवेळा मी आणि उद्धव ठाकरे यांनी मार्ग काढला. आताही मी अनेकदा त्यांना फोन केले पण त्यांनी स्वीकारला नाही, असा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला आहे.