‘परप्रांतियांची नोंद ठेवा’ मुख्यमंत्र्यांचे पोलीस यंत्रणेला आदेश

uddhav thakre

मुंबई: साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला आहे. आता यापुढे राज्यातील परप्रांतीयांची नोंद होणार आहे. याबाबतीत मुख्यमंत्र्यांनी पोलीस यंत्रणेला आदेश दिले आहेत.

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सतत परप्रांतीयांची माहिती ठेवण्याची मागणी केली होती. राज्यात परप्रांतीय कोठून येतात, ते कोठे वास्तव करतात याची कोणतीच माहिती नसते. मात्र यासंबंधी पोलीस यंत्रणेकडे रेकॉर्ड असायला हवा. अशी मागणी राज ठाकरे यांनी सतत केली होती. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी हा मोठा निर्णय घेतला आहे. आता माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेणार नाही. त्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये तडजोड होणार नाही. अशा नराधमांना वचक बसवा, असे मुख्यमंत्री ठाकरेंनी महिला व बालकांच्या सुरक्षेकरता आयोजित गृहविभागाच्या आढावा बैठकीत म्हटले आहे.

त्यामुळे पोलिसांना आता इतर राज्यातून येणाऱ्यांची नोंद ठेवावी लागणार आहे. ते येतात कुठून जातात कुठे याचा रेकॉर्ड पोलीस यंत्रणेला ठेवावा लागणार आहे. जलदगती न्यायालयांतून निकाल लागतो. पण शिक्षेच्या अंमलबजावणीबाबत आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियेबाबत सुधारणा करण्याचे प्रयत्न व्हावेत. असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच गुन्ह्यात रिक्षांचा वापर होत असल्याने रिक्षांच्या अनधिकृत हस्तांतरणाला पायबंद घालून नोंदणी करताना, स्थानिक पोलिसांकडे माहिती देणे परवानाधारकाला बंधनकारक असणार आहे. तर शक्ती कायद्यातही  सुधारणा करण्यात येणार आहे. महिला पोलीसांनी पीडीत महिलांशी विश्वासाने बोलून माहिती घ्यावी. त्यांच्या छोट्या तक्रारींकडेही दुर्लक्ष होऊ नये. असे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या :