मुख्यमंत्र्यांचा विश्वास फक्त महाजन आणि चंद्रकांत पाटलांवरच : पृथ्वीराज चव्हाण

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात गेले दोन दिवस पावसाने कहर केला आहे. कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक लोक पुरात अडकले आहेत. त्यामुळे त्यांच्या बचावासाठी गोवा कोस्टगार्डचे हेलिकॉप्टर कोल्हापुरात एअरलिफ्टिंगसाठी दाखल झाले आहेत. तसेच एनडीआरएफ आणि नेव्हीचे जवान देखील बचावकार्यासाठी दाखल झाले आहेत.

राज्य सरकारतर्फे दोन मंत्र्यांना म्हणजे चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांना सरकारने पूरग्रस्त भागात पाठवले आहे. यावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वक्तव्य केले आहे. त्यांनी ‘मुख्यमंत्र्यांचा प्रचार दौरा सुरू आहे. पण त्यांनी कोल्हापूर, सांगलीचा दौरा केला असता तर लोकांना दिलासा मिळाला असता तसेच दोन मंत्र्यांना सरकारने पाठवले ते आधीच पाठवायला हवे होते. गिरीश महाजन काय काय करणार, पळवा पळवी करणार की पाहणी करणार. मुख्यमंत्र्यांचा इतर कुठल्या मंत्र्यांवर विश्वास नाही’ अस विधान केले आहे.

Loading...

पुढे बोलताना चव्हाण यांनी ‘मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी पूरस्थिती गंभीर असतानाच मंत्र्यांना पाठवायला हवं होतं, आपत्ती व्यवस्थापन सक्षम करायला हवं. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे त्यांनी आपली यात्रा दोन दिवस बाजूला ठेवून हवाई दौरा करावा त्यातून सरकार आपल्याबरोबर आहे हा दिलासा लोकांना मिळेल’ असंही चव्हाण म्हणाले आहेत.

दरम्यान, सांगलीत जिल्ह्यात देखील अशीचं आपत्ती आली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कृष्णा नदीला पूर आला आहे. नदी काठचा भाग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. कृष्णा नदीने ५४ फूट पाणी पातळी गाठली आहे. जिल्ह्यातील पश्चिम भागाकडील वाळवा, पलूस, शिराळा या तालुक्यात पूर आला आहे. या पुरात हजारो लोक अडकले आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी एनडीआरएफच्या टीम बरोबरच लष्करी जवान देखील दाखल झाले आहेत.

काश्मीर भारताचा अविभाज्य घटक; प्रसंगी यासाठी जीवही देऊ : अमित शाह

बैल कुठं, नांगर कुठं आणि तोंड फोटोकडं, अमोल कोल्हेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

शिवस्वराज्य यात्रा : पुढचा मुख्यमंत्री आघाडीचाचं – अमोल कोल्हे

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
माझ्या भावाची प्रकृती ठणठणीत, काळजी करण्याचे कारण नाही - उदयनराजे भोसले
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार