मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खूपच अहंकारी – संजय राऊत

Sanjay-Raut

टीम महाराष्ट्र देशा :  पालघर येथील जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सनसनाटी ऑडिओ क्लीप उघड केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लिपची मोडतोड करण्यात आली आहे. मी कार्यकर्त्यांना कुठेही या नीतीचा वापर करण्याचा संदेश दिला नाही. मी बोलल्या वक्तव्यापैकी काहीही चुकीचं बोललो असेल तर माझ्यावर कारवाई करा. मात्र निवडणूक आयोगाने ज्यांनी हि एडीट करून क्लिप वाजवली त्यांच्यावरही कारवाई करा अशी मागणी अशी मागणी केली आहे.

दरम्यान आता या ऑडिओ क्लिपचा दाखला देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खूपच अहंकारी आहेत असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

विरोधीपक्षांबाबत अशा भाषेचा वापर मुख्यमंत्र्यांच्या तोंडी शोभत नाही, मुख्यमंत्री हे खूपच अहंकारी आहेत. आपण राजकारणात पाहिले आहे की, जेव्हा कुत्राही सत्तेत आल्यानंत स्वत:ला वाघ समजायला लागतो, अशा कठोर शब्दात राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजपामधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे.

भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक होत असून, भाजप आणि शिवसेनेसाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपकडून काँग्रेसमधून आयात केलेले राजेंद्र गावित हे उमेदवार देण्यात आले आहेत. तर शिवसेनेकडून भाजपमधून शिवसेनेमध्ये गेलेले श्रीनिवास वनगा हे उमेदवार आहेत. दरम्यान जसजशी निवडणूक जवळ येत आहे तशी प्रचारातली रंगत वाढत असून, आरोप प्रत्यारोपाचं राजकारण रंगतांना दिसत आहे.