fbpx

फ्लॅशबॅकची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी ठेवले पवारांच्या मर्मावर बोट

टीम महाराष्ट्र देशा – भाजपने गांधी घराण्याला टार्गेट केल्याने निवडणुकांत भाजपला फटका बसल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले होते. पवारांनी मोदी आणि भाजपवर निशाणा साधल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे. पवारांनी 1999 मध्ये सोनिया गांधींच्या विदेशी मुद्दय़ासह आपण काय काय टीका केली होती हे आठवले तर बरे होईल, असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

एका वृत्तसमूहाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी पवारांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. याशिवाय शिवसेनेसोबतच्या संबंधावर देखील मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. शिवसेनेसोबत युती होणार काय आणि जागावाटपाचा फार्म्युला 50-50 असा असेल काय असा प्रश्न या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेसोबत युती होणारच असे ठामपणे सांगितले.

सत्तेत येण्याची खात्री नसल्याने मोठमोठी आश्वासने दिली : नितीन गडकरी