महापूर ओसरला, मुख्यमंत्र्यांच्या महाजानदेश यात्रेला पुन्हा प्रारंभ

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजानादेश यात्रा काढली होती. मात्र ही यात्रा कोल्हापूर आणि सांगलीत आलेल्या जलआपत्तीमुळे स्थगित करण्यात आली होती. आता या दोन्ही जिल्ह्यावरची जल आपत्ती टळली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची महा जनादेश यात्रेचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. १७ ऑगस्टपासून महाजानादेश यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. त्यासाठीचे नियोजन सुरू झाले आहे. पहिला टप्पा विदर्भात झाला. आता दुसऱ्या टप्प्यात नगर आणि मराठवाड्यातून यात्रा सुरू होणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात १८ ऑगस्ट रोजी यात्रा नगर जिल्ह्यात येणार आहे. १८ रोजी त्यांच्या अकोले व संगमनेरला सभा होणार असून, याच दिवशी राहुरी व नगरला स्वागत समारंभ होणार आहेत व १९ रोजी पाथर्डी, आष्टी व जामखेड येथे सभा घेऊन फडणवीस बीडकडे जाणार आहेत. भाजपकडून या यात्रेची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या दुसऱ्या टप्प्यात यात्रा ९३ विधानसभा मतदारसंघांत २,७४५ किलोमीटर एवढा प्रवास करणार आहे.

दरम्यान कोल्हापूर सांगली या जिल्ह्यात आलेला महापूर आता ओसरला आहे. मात्र नागरिक अजूनही अन्न, वस्त्र निवारा या मुलभूत गरजांपासून वंचित आहेत. प्रशासनाकडून पूरग्रस्तांना सर्वोतपरी मदत पुरवली जात आहे. तर काही सेवाभावी संस्थांनी देखील पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. तर अनेक नेत्यांनी आपल्या वैयक्तिक पातळीवर पूरग्रस्तांना आर्थिक मदत करत आहेत.

महत्वाच्या बातम्या