कोरेगाव भीमाच्या घटनेस मुख्यमंत्रीच जबाबदार – प्रीती मेनन

औरंगाबाद: कोरेगाव भीमाला घडलेल्या घटनेच्या दिवशीच जर मुख्यमंत्र्यांनी दलित बांधवांच्या भावना समजावून घेत दोषींवर कारवाई केली असती तर महाराष्ट्रात पुढील उद्रेक झाला नसता. मात्र ते केल गेल नाही त्यामुळे या घटनेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा आरोप आपच्या सदस्या प्रीती मेनन यांनी केला आहे.

राज्य सरकारला शरद पवारांच्या पक्षाचा पाठींबा असल्यामुळेच सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना अटक करण्याची त्यांची हिम्मत नसल्याची टीकाही तमेनन यांनी केली. सिंदखेडराजा येथे जिजाऊ जयंतीनिमित्ताने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत होणार्‍या कार्यक्रमाची पूर्वतयारी व पाहणी करण्यासाठी प्रीती मेनन आल्या होत्या. यावेळी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत त्यांनी संवाद साधला.

You might also like
Comments
Loading...