मुख्यमंत्री शिवसेनेला एक तर राणेंना वेगळ सांगतात आणि दोघांनाही खेळवतात – जयंत पाटील

टीम महाराष्ट्र देशा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांना मंत्रीपद देण्याच आश्वासन दिल आहे, मात्र दुसरीकडे तेच शिवसेनेला एक आणि राणेंना वेगळेच सांगत दोघांनाही खेळवत असल्याचा टोला राष्ट्रवादीचे गटनेते आमदार जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना लगावला आहे.

शिवसेनेला सत्तेत किंमत मिळत नसूनही ते अजून सत्तेत का राहिले असा प्रश्न आहे. राज्यात शिवसेनेला विश्‍वासात घेऊन सरकारचे कोणतेही निर्णय होताना दिसत नसल्याची टीकाही पाटील यांनी केली.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की ‘राज्यात अट्टल गुन्हेगारच भाजपचे कार्यकर्ते असून मुख्यमंत्र्यांचा गृह विभागावर वचक राहिलेला नाही. दोन वर्षांपूर्वी अशा गुन्हेगारांवर कारवाईचे आश्‍वासन देऊनही ते पाळलेल नाही.