मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अपघाताला १ वर्ष पूर्ण, अपघातात ज्याचं घर पडलं ते अजूनही वाऱ्यावरच

टीम महाराष्ट्र देशा: एक वर्षांपूर्वी लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर कोसळलं होतं. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाली तरीही ज्यांच्या घरावर हेलिकॉप्टर कोसळले त्यांच्या घराला अजूनही वाऱ्यावर सोडल्याचे दिसत आहे. ज्या घरावर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं त्या घराचं अतोनात नुकसान झालं. त्यावेळी मुख्यमंत्री आणि लातूरच्या पालकमंत्र्यांनी त्या कुटुंबाला तात्काळ शासकीय योजनेतून नवं घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं. मात्र याला वर्ष उलटून गेलं तरी अद्याप हे कुटुंब घराच्या प्रतिक्षेत आहे.

Loading...

संबंधित घर मालकाने अनेक वेळा आपली कैफियत मांडूनही त्याला अजूनही घर मिळाले नाही. घराऐवजी पत्र्याचं शेड बांधून दिलं असा दावा करतानाच ते घरच कांबळे कुटुंबियांच्या नावावर नसल्याचं सांगण्याचा प्रयत्नदेखील संभाजी पाटील निलंगेकर यांनी केला आहे. अपघात झाल्यानंतर लगेचच नव्या घराचं आश्वासन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिलं होतं. मात्र त्या विधानावरून आता पालकमंत्री देखील माघार घेताना दिसत आहेत.

ही सर्व घटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरने झाली त्यांना देखील याची जाणीव का नसावी असा प्रश्न पडला आहे. कांबळे कुटुंबियांचं या अपघातात मोठं नुकसान झालं पण त्यांना कोणतीही मदत न मिळाल्यामुळे तूर्तासतरी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना आपल्या आश्वासनाचा विसर पडल्याच दिसत आहे.Loading…


Loading…

Loading...