‘विटंबनेचे कृत्य वाईटच, सावरकरांचा सन्मान सर्वांनी राखला पाहिजे’

blank

टीम महाराष्ट्र देशा : दिल्ली विद्यापीठातील कला विभागाच्या बाहेर असलेल्या विनायक दामोदर सावरकरांच्या पुतळ्यास कॉंग्रेस पक्षाची विद्यार्थी विंग असणाऱ्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या गुंडांनी गुरूवारी काळे फासले असल्याची घटना घडली आहे. एनएसयूआयचा दिल्ली प्रदेशाध्यक्ष असलेल्या अक्षय लकराने हे संतापजनक कृत्य केले आहे. एका बाजूला सोशल मिडीयावर या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बहुमुल्य योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत असे कृत्य करणे हे वाईट आहे. सावरकरांचा सन्मान सर्वांनी राखला पाहिजे. कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही, याची समाजाने दखल घेतली पाहिजे. असे कृत्य कोणीही करू नये, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. सावरकरांच्या पुतळ्याच्या विटंबने नंतर राज्यातील आणि देशातील वातावरण अस्थिर झाले आहे. सावरकर समर्थकांनी सदर घटनेचा निषेध केला आहे.

तर सावरकरवाद्यांनी सोलापुरात कॉंग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या फोटोला काळ फासण्यात आले आहे. तसेच अनेक नेत्यांनी सावरकर घटनेने बाबत प्रतिक्रिया दिली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते मंदार जोशी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मी या घटनेचा 100 टक्के निषेधच करतो. कोणत्याही महापुरुषांची विटंबना हा आपल्या इतिहासाचा अपमान आहे,.आणि महापुरुषांची विटंबना करणे ही प्रकारची एक विकृती आहे. कॉंग्रेस चा सर्वत्र जो पराभव होत चाललेला आहे त्याच निराश पणाची ही विकृती आहे, असे ते म्हणाले.