fbpx

आम्ही दहशतवाद्यांची आणि पाकिस्तानची गय करनार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

टीम महारष्ट्र देशा : येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती लोकसभा मतदार संघातील कायम दुर्लक्षित अशा सुपे गावात प्राचार सभा घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मागचे सरकार हल्ला झाल्यावर फक्त पत्र व्यवहाराद्वारे पाकिस्तानकडुन झालेल्या हल्ल्याचा निषेध करत होते. परंतु आम्ही या दहशतवाद्यांची आणि पाकिस्तानची गय करनार नाही त्यांना जशास तसे उतर देऊ अशा थेट आणि कड़क शब्दात मुख्यमंत्र्यानी टिका करत भाजपला मत देण्याचे आवाहन केले. तसेच आमच्या देशात कोणी घुसू पाहत असेल तर आम्ही त्यांना देशात घुसून मारू असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

यावेळी मंचावर जलसंपदामंत्री विजय शिवतारे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार राहुल कुल देखील उपस्थित होते. त्यांनी देखील जन समुदायाला संबोधित करताना आतापर्यंत कॉंग्रेसने केलेल्या चुकांचाचं पाढा वाचला.

दरम्यान बारामती लोकसभा मतदार संघामध्ये यंदा चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. कारण आघाडीच्या भक्कम उमेदवार सुप्रिया सुळे आणि भाजपच्या कांचन कुल असा सामना रंगणार आहे. बारामती हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांचा बालेकिल्ला असला तरी यंदाची निवडणूक त्यांना चांगलीच अटीतटीची ठरणार आहे.