विखें बरोबर भाजपमध्ये येणाऱ्या कॉंग्रेस आमदारांबाबत फडणवीस अनुकूल नाहीत

टीम महाराष्ट्र देशा : माजी विधानसभा विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे लवकरचं भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त माध्यमांवर झळकत आहे. तसेच विखे पाटील यांच्या बरोबर कॉंग्रेसचे इतर ८ ते १० आमदार देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विखेंबरोबर पक्षात येणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांच्या भाजप प्रवेशाबाबत अनुकूल नाहीत. कारण ‘तुम्हाला भाजपत यायचे असेल तर वैयक्तिक चर्चा करा, असा निरोप काँग्रेसच्या इच्छुक आमदारांना दिला जात असल्याची माहिती आहे.

Loading...

विखे यांनी दोन दिवसांपूर्वी आमदारकीचा राजीनामा दिला. तर ते आता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या बरोबर कॉंग्रेसचे अब्दुल सत्तार, भारत भालके, सुनील केदार, जयकुमार गोरे, कालिदास कोळंबकर असे काही आमदार हे भाजपमध्ये येऊ इच्छित आहेत. मात्र विखे यांच्या माध्यमातून काँग्रेसच्या आमदारांना भाजपत घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल नाहीत. त्यामुळेच विखे यांनी त्या आमदारांच्या वतीने बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

भाजपत प्रवेश करू इच्छिणाऱ्या आमदारांशी मुख्यमंत्री वैयक्तिकरीत्या बोलत असल्याची माहिती आहे. जयकुमार गोरे, अब्दुल सत्तार, भारत भालके, कालिदास कोळंबकर आदी आमदारांशी मुख्यमंत्र्यांचे वैयक्तिक चांगले संबंध आहेत. त्यांना कोणाच्या मध्यस्थीची गरज नाही. मुख्यमंत्री म्हणतील तसा निर्णय मी घेईन, असे कोळंबकर यांनी आधीच म्हटले आहे.

दरम्यान ‘काँग्रेसच्या आमदारांना भाजपत जाताना त्यांच्या राजकीय भवितव्याचे काय या बाबत काही हमी हवी असणार. त्या बाबत भाजपच्या नेतृत्वाशी मी बोलू शकतो, असे या आमदारांना वाटत असल्याने ते माझ्या संपर्कात आहेत. याचा अर्थ मी त्यांचे नेतृत्व करीत आहे, असा होत नसल्याचे विखे यांनी दोन दिवसांपूर्वीच पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते.Loading…


Loading…

Loading...