बारामतीमध्ये पवारांचे बेटी बचाओ धोरण चालू आहे : देवेंद्र फडणवीस

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यात जोरदार प्रचाराचा धडाका लावला आहे. या प्रचारा वेळी भाजप पक्षाकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विशेष लक्ष केले जात आहे. मोदी यांच्या नंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील पवारांवर टिकांचा भडिमार लावला आहे. तर शरद पवार हे बेटी बचाओ मोहिमेचे उदाहरण आहेत. स्वतःच्या मुलीला पराभवापासून वाचविण्यासाठी ते धडपड करत असल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना लगावला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारार्थ खडकवासला येथे आले असता त्यांनी ही टोलेबाजी केली.

यावेळी फडणवीस म्हणाले की, राष्ट्रवादीचे कॅप्टन शरद पवार यांनी पराभवाची चाहूल लागताच माढय़ाच्या मैदानातून पळ काढला. पराभवाच्या भीतीतूनच खासदार सुप्रिया सुळे या भाजपा कार्यकर्त्याला घरात घुसून मारण्याची धमकी देत आहेत.

तसेच लोकसभा निवडणुकीतील राजकीय वातावरण व हवेची दिशा ओळखूनच पंतप्रधान मोदींवर टीका करणारे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे सरकारचे बेटी बचाओ मोहिमेचे उदाहरण म्हणूनच स्वतःच्या मुलीला, सुप्रिया सुळे यांना पराभवापासून वाचविण्यासाठी धडपडत करत आहेत अशी बोचरी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

पुढे फडणवीस यांनी संरक्षणावर भाष्य केले. ते म्हणाले की, परदेशात घुसून शहीद सैनिकांच्या मृत्यूचा बदला घेणाऱया राष्ट्रांच्या यादीत भारत जगातील तिसरा देश ठरला आहे. तर सैनिकांचे मनोधैर्य खच्ची करणारा आणि देशद्रोह्यांचे मनोबल वाढविणारा जाहीरनामा र्कॉंग्रेस-राष्ट्रवादी कडून तयार केला जात आहे. त्यामुळे त्यांचा पराभव करण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.Loading…
Loading...