महाराष्ट्रात सर्वाधिक 4 लाख टन म्हणजे 45 टक्के तूर खरेदी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आतापर्यंत जेवढ्या शेतकऱ्यांनी तूर खरेदी केंद्रावर नोंदणी केली आहे, त्यांची तूर 5 हजार 50 रुपये हमीभावाने खरेदी केली जाईल, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

एकूण तूर खरेदी 11 लाख टन आहे. यापैकी एकट्या महाराष्ट्रात सर्वाधिक 4 लाख टन म्हणजे 45 टक्के तूर खरेदी करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

युपीए सरकारच्या काळात 2011-12 साली नाफेडने बोनस देऊन सुद्धा फक्त 20 हजार टन तूर खरेदी झाली होती.

व्यापाऱ्यांकडे तुरीला साडे तीन ते चार हजार रुपये भाव आहे. मात्र सरकार नाफेडच्या तूर खरेदी केंद्रांवर 5 हजार 50 रुपये हमीभावाने तूर खरेदी करणार आहे. यासाठी सरकार एक हजार कोटी रुपये अधिकचे उपलब्ध करून देईल, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

 

You might also like
Comments
Loading...