दुष्काळ आढावा बैठकीतून धनंजय मुंडे का बाहेर पडले, वाचा कारण

बीड-जिल्ह्यात दुष्काळामुळे परिस्थिती गंभीर बनली असतांना बैठकांवर बैठका हे काही आम्हाला मान्य नाही असं सांगत विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर शरसंधान केलं आहे. दुष्काळाची पाहणी आणि प्रशासकीय आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड मध्ये दाखल झाले होते मात्र या बैठकीतून मुंडे यांनी निषेध व्यक्त करत काढता पाय घेतल्याच चित्र पहायला मिळालं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या आठवड्यातच दुष्काळ पाहणीसाठी बीडमध्ये येणार होते. मात्र ऐनवेळी त्यांचा दौरा आठवडाभरासाठी पुढे ढकलण्यात आला होता. आज मुख्यमंत्री बीड जिल्ह्यात दाखल झाले. ते बीड जिल्ह्यातील भीषण दुष्काळाची पाहणी आणि प्रशासकीय आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. त्यांच्यासोबत पालकमंत्री पंकजा मुंडे, या देखील पोहोचल्या आहेत. तसेच बैठकीसाठी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित होते. मात्र काही वेळातच धनंजय मुंडे हे या बैठकीतून बाहेर पडले.

नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे ?
‘बीडमधील दुष्काळ परिस्थिती, शेतकऱ्यांची स्थिती पाहता जनावरांसाठी चार छावणी, पाण्यासाठी विहिऱ्यांची परवानगी अशा गोष्टींसाठी तातडीने मदत गरजेची आहे. त्याचे निवेदन मी मुख्यमंत्र्यांना दिले आणि निघालो. कारण बैठकांवर बैठका हे काही आम्हाला मान्य नाही, दुष्काळावर मात करण्यासाठी तातडीने मदत आणि उपाय योजनांची गरज आहे. ते काम प्रशासनाचं आहे. त्यामुळे आम्ही निवेदन देऊन बाहेर पडलो.’ ‘जिल्ह्यात 1972 पेक्षा भयानक दुष्काळ आहे. खरीप रब्बी पिकांचे नुकसान मोठे आहे. अशावेळी शेतकऱ्यांच्या उपाययोजना करण्यासाठी सरकारने तिजोरी रिकामी करावी. केवळ बैठकावर बैठक घेऊन काही होणार नाही त्यावर अंमलबजावणी होणे गरजेचे आहे’.

You might also like
Comments
Loading...