मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत न केल्यास साखर कारखान्यांवर होणार कारवाई ?

पुणे : राज्यातील गरीब आणि गरजू रुग्ण केवळ पैशाअभावी वैद्यकीय उपचारापासून वंचित राहू नये म्हणून फडणवीस सरकारने मुख्यमंत्री सहायता निधी योजना लागू केली. आतापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून अनेक रुग्णांना मदत करण्यात आली आहे. मात्र, गेल्या पाच सहा महिन्यांपासून मुख्यमंत्री सहायता निधीत एकही पैसे नसल्यामुळे राज्यातील ५००० हून अधिक रुग्णांना उपचारासाठी येणारी मदत रखडली असल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

Loading...

या सहायता निधीसाठी येणाऱ्या अर्जांची संख्या वाढली असल्याने राज्यातील गरीब कुटुंबातील गरजू रुग्णांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन दिल्यानंतर सहायता निधी कक्षाकडे माहिती विचारली असता निधीच उपलब्ध नाही, असे सांगण्यात आले होते. आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर कारखान्यांनी सहाय्यता निधीला मदत न केल्यास कारवाईचा इशारा पुण्यात बोलताना दिला आहे.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस ?

“साखर उद्योग ज्या-ज्या वेळी अडचणीत आला, त्या-त्या वेळी राज्य सरकार मदतीला धावून आले. भविष्यातही सरकार कारखान्यांच्या मदतीला धावून येईल. मात्र, साखर कारखान्यांनी ज्या पद्धतीने सहकार्य करायला पाहिजे, तसे सहकार्य केलेले नाही. यापुढच्या काळात साखर कारखान्यांकडून मदतीची अपेक्षा आहे. कारखान्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत न केल्याने २ वर्षात मोठी तूट निर्माण झाली आहे. साखर कारखान्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करावी आणि सरकारला कारवाई करण्यास भाग पाडू नये.Loading…


Loading…

Loading...