…या कारणासाठी आम्ही भाजपात इतर पक्षातील नेते घेतो : मुख्यमंत्री फडणवीस

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातल्या राजकारणात भाजपची प्रगती पाहता अनेक विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजप प्रवेशाचा धडका लावला आहे. या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पक्षांतरावरून विरोधकांकडून भाजपवर टीका होत आहे. मात्र यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. प्रत्येक पक्षात थोडीफार चांगली माणसं असतात. उगीचच विरोधी पक्षातल्या नेत्यांचा त्रागा करू नये. पण भाजपात घेताना आम्ही मात्र त्यांना तपासून घेतो, असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

याबबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पक्षाच्या वाढीसाठी काही निर्णय घ्यावे वागतात. तसेच पक्षवाढीसाठी दुसऱ्या पक्षातून सक्षम आणि चांगली माणसं घेणं हे आवश्यक असते, निवडणुकीवेळी निष्ठावंतांना डावलून आयातांना तिकीट दिले जाते असं बोललं जातं. मात्र या आरोपात कोणतंही तथ्य नाही. आम्ही पक्षातील 85 टक्के नेत्यांना उमेदवारी देतो आणि 15 टक्के इतर पक्षातून आलेल्या नेत्यांना उमेदवारी देतो असं ते म्हणाले.

दरम्यान लोकसभा निवडणुकीतील भाजपचे घवघवीत यश पाहता राज्यातील काही विरोधी नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात प्रवेश करण्याचा धडका लावला आहे. त्यामुळे सध्या भाजपात इनकमिंगचे प्रमाण मोठे आहे. यावरून विरोधकांकडून वारंवार भाजपवर बोचऱ्या टीका केल्या जातात. मात्र या टीकेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.