‘सुळे निवडून आल्या तर इव्हीएम चांगलं आणि मुंडेंच्या मुली जिंकल्या तर मशीन खराब’

cm devendra fadanvis

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर विरोधकांनी पराभवाचे खापर इव्हिएमवर फोडले आहे. तर एकत्र येत विरोधकांनी ईव्हीएम विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत इव्हीएम बंदीचा नारा दिला आहे. यावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चांगलेचं सुनावले आहे. शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे ह्या निवडुन आल्यातर इव्हीएम चांगले, मात्र गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रतीम मुंडे ह्या निवडून आल्यावर इव्हीएम मशीन खराब असा कांगावा विरोधक करतात असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढलेली मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सोमवारी बीड येथे पोहचली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लक्ष्य केले. फडणवीस म्हणाले की, २००४ पासून २०१४ पर्यंत प्रत्येक निवडणुक इव्हीएमवर झाली. तेव्हा विरोधकांच सरकार सत्तेवर होत. तेव्हा इव्हीएममध्ये कोणताच दोष नव्हता. मात्र मोदी सरकार येताच इव्हिएम हे खराब झाले. मात्र इव्हीएम खराब नसून विरोधकांचे डोके खराब आहेत. त्यमुळे ते आता जनतेतून नेस्तनाबूत होत आहेत, असा टोला मुख्यमंत्री यांनी लगावला.

दरम्यान लोकसभा निवडणुकीचा आलेला निकाल हा विरोधकांसाठी खूपच धक्कादायक होता. या निकालानंतर विरोधकांनी पराभवच दोषी इव्हिएमला ठरवेले होते. त्यामुळे सगळ्या विरोधकांनी एकत्र येत इव्हीएम विरोधी चळवळचं उभी केली होती. तर राज्यात होणारी आगामी विधानसभा निवडणूक ही बॅलेट पेपर घ्यावी अशी मागणी विरोधकांनी केली होती. विरोधकांच्या याच मागणीचा धागा पकडत मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीडची सभा गाजवली.