बारामतीच्या पोपटाचा लंगोटही उद्धवजींनी काढून घेतला

blank

टीम महाराष्ट्र देशा- कोल्हापुरातील तपोवन मैदानात शिवसेना-भाजप युतीची महासभा काल पार पडली. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सेना-भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर तुफान टीका केली.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर बारामतीचा पोपट असा पुनरुच्चार करून मुख्यमंत्र्यांनी बोचरी टीका केली. ते म्हणाले, हा पोपट नव्याने बोलू लागला आहे. त्याचे कपडे आम्ही विधानसभेला व महापालिका निवडणुकीत उतरविले. आता उरलासुरला लंगोटही उद्धव यांनी काढून घेतला. त्यामुळे आता तुम्ही शांत घरी बसा, आणि मोदींना पंतप्रधान होताना पहा असा खोचक सल्ला देखील त्यांनी दिला.

काँग्रेसवाल्यांनी काल ५६ पक्षांच्या आघाडीची घोषणा केली. रस्त्यावर दिसेल त्याला पक्षात घेऊन ही आघाडी बनली आहे. देश चालवायला ५६ पक्ष नव्हे तर ५६ इंचाची छाती लागते असं म्हणत महाआघाडीवर देखील सडकून टीका केली.