‘आमचे पहिलवान तेल लाऊन मैदानात उतरलेत, पण समोर कुणीच नाही’

टीम महाराष्ट्र देशा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. धुळे ग्रामीणमधील नेर येथे बोलताना त्यांनी निवडणूक सुरु झाली आहे, काही दिवसांवर मतदान आलं आहे. पण निवडणुकीत मजाच येत नाहीए. कारण समोर कोणी दिसतच नाही. आपले सर्व पहलवान तेल लाऊन मैदानात उतरलेत. मात्र, समोर दुसरा पहलवानच दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पायपोस एकमेकांच्या पायात नाहीत. त्यामुळे ते पहिल्यापासूनच पराजयाच्या मानसिकतेच गेले आहेत असं विधान केले आहे.

पुढे बोलतानाकालपरवा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जाहिरनाम्यात त्यांनी जगातली सर्व आश्वासने देऊन टाकली फक्त प्रत्येकाला ताजमहाल बांधून देण्याचे आश्वासनं देणं बाकी राहिलंय. कारण आश्वासनं पूर्ण करायची नाहीत हे त्यांचे धोरण आहे. पन्नास वर्षे खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारचं राजकारण यांनी केलं. जनतेचा नव्हे तर स्वतःचा फायदा करुन घेतला असं विधान केले आहे .

पुढे बोलताना त्यांनी गेल्या पाच वर्षात हे केंद्रातील आणि राज्यातील सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप लावू शकले नाहीत. आम्ही चोवीस तास जनतेकरीता काम केलं असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. पंधरा वर्षांत ज्या राज्यातला शेतकरी पूर्णपणे उद्धवस्त झाला होता, अशा महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहिलो. पंधरा वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने शेतकऱ्यांना २० हजार कोटीची मदत केली असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान पुढे बोलताना आपण बघितलं या महाराष्ट्राची देशाची जगात काय शान आहे. काल परवा मोदी अमेरिकेत गेले होते. यापूर्वी आपले पंतप्रधान अमेरिकेत जायचे तर त्यांना तिथला मंत्री देखील विचारत नव्हता. मात्र, मोदींच्या भाषणाला अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हजर होते आणि दीड तास प्रेक्षकांमध्ये बसून मोदींचं भाषण ऐकलं त्यांचा हात हातात घेऊन त्यांनी सांगितलं की, मोदी हे केवळ भारताचे नेते नाहीत तर ते विश्वनेते आहेत असं ते म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या