यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी उदयनराजेंच्या प्रवेशाला गैरहजर, मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण

blank

टीम महाराष्ट्र देशा: साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आपल्या प्रवेशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थिती राहणार असल्याचं उदयनराजे यांनी ट्विटद्वारे सांगितले होते, मात्र प्रत्यक्षा. केवळ भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा प्रवेश झाला, यावरून अनेकांनी भाजपवर निशाणा साधला होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानाच्या अनुपस्थितीचा खुलासा केला आहे. पंतप्रधानांना कुठल्याही राजकीय पक्षप्रवेशाला उपस्थित राहता येत नाही. हा राजकीय शिष्टाचार आहे. त्यामुळे उदयनराजेंच्या पक्षप्रवेशाला नरेंद्र मोदी आले नाहीत अशी माहिती त्यांनी दिली

उदयनराजे भोसले यांच्या अटीनुसार त्यांचा भाजप प्रवेश पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत व्हावा, असे सांगितले होते. प्रवेशावेळी पंतप्रधान मोदींनी उपस्थित राहावे आणि सातारा लोकसभा मतदार संघाची निवडणूक विधानसभेसोबत व्हावी या दोन अटींचा समावेश होता. मात्र प्रत्यक्षात असे न झाल्याने सोशल मिडीयावर वेगेवेगळ्या चर्चा सुरु आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना याबाबत खुलासा करावा लागला आहे.