राणे दिल्लीदरबारी ; फडणवीस आणि शहांसोबत बंद दाराआड तब्बल एक तास खलबत

टीम महाराष्ट्र देशा : भाजपाध्यक्ष अमित शाहांच्या दिल्लीमधल्या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि नारायण राणे यांच्यात एक तास चर्चा झाली. या बैठकीत राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावर चर्चा झाली असावी, असा अंदाज लावला जात आहे.

अमित शाहांच्या निवासस्थानी काल रात्री उशिरा ही चर्चा झाली. एवढंच नव्हे, तर बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि नारायण राणे हे एकाच गाडीतून अमित शाहांच्या घरामधून बाहेर पडले. या बैठकीला आमदार नितेश राणे हे देखील उपस्थित असल्याची माहिती आहे.

भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेसाठी फडणवीस दिल्लीत गेले होते. त्याचवेळी राणेही दिल्लीत उपस्थित होते. पुढच्या महिन्यात राज्यसभा निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय.