मुंबई: आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. आज सकाळच्या सुमारास मुख्यमंत्री त्यांच्या ताफ्यासह स्मृतीस्थळावर पोहचले. त्यानंतर त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करून पुष्प अर्पण केले.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बंड केले आणि भाजपशी युती करत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री पदी विराजमान झाले. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत, नेते अनिल परब यांच्यासह पक्षातील इतरांनी शिंदेंवर पक्षाशी निष्ठा न जपल्याबद्दल टीका केली. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजूनही मी शिवसैनिक असल्याचे सांगतात. तसेच बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहेत, असे देखील सांगतात.
काय म्हणाले संजय राऊत?
“बाळासाहेब ठाकरे हे आमच्या सगळ्यांचे गुरु होते. ज्यांची शिवसेनेवर निष्ठा आहे, महाराष्ट्रावर आणि देशावर निष्ठा आहे. त्या सगळ्यांचे बाळासाहेब हे गुरु होते. मात्र आता काही लोक शिवसेनेच्या बाहेर जाऊन बाळासाहेब आमचे गुरु आहेत, असे म्हणत आहेत. जर आज बाळासाहेब असते तर पक्षाशी एकनिष्ठ न राहिलेल्या या लोकांवर त्यांनी काय भाष्य केले असते, हे समजून घेणे गरजेचे आहे. एकनिष्ठ राहणे हीच खरी गुरुदक्षिणा आहे”, असे संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<