मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही;ते बंगले,दालन आणि पालकमंत्री पदाचा वाद सोडवण्यात व्यस्त

given the status of freedom fighters

टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्रात नव्याने आलेल्या उद्धव ठाकरे सरकाराला शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. कारण त्यांच्या नेत्यांमध्ये सत्तेसाठी सुरु असेलला वाद संपल्यावर त्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळणार असल्याचा टोला माजी मुख्यंमत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटर च्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

बंगले,दालने आणि पालकमंत्रीपदीवरून वाद सुरु आहेत, हे सर्व वाद पुढील सहा-आठ महिन्यात जर मिटली तर, त्यांनतर सरकारमध्ये असलेले नेते कदाचित शेतकऱ्यांकडे वळून पाहतील.सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षातील नेत्यांमध्ये सुरु असलेले भांडण संपले तर त्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ मिळणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

मात्र तोपर्यंत तरी ते शेतकऱ्यांकडे लक्ष देतील असे वाटत नसल्याचा खोचक टोला फडणवीस यांनी सरकारला लगावला आहे.