गोंदिया-भंडारा, पालघरची पोटनिवडणूक आम्हीच जिंकणार – फडणवीस

मुंबई – भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पालघरमध्ये आणि भाजपचे बंडखोर खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या गोंदिया-भंडारा या लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. दरम्यान या दोन्ही पोटनिवडणुका भाजपच जिंकणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

bagdure

पालघरमध्ये भाजपकडून राजेंद्र गावित हे निवडणूक लढवणार आहेत. गावित यांनी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलाय. दरम्यान यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, गोंदिया-भंडारा आणि पालघरची लोकसभा पोटनिवडणूक भाजपाच जिंकेल, जनतेने गेल्या चार वर्षांतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारचे काम बघितले आहे. त्यांच्या नेतृत्वावरील मतदारांचा विश्वास पोटनिवडणुकीत दिसेल.

You might also like
Comments
Loading...