राज्य हागणदारी मुक्त झाले ; मुख्यमंत्र्यांचा दावा

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्राने हागणदारी मुक्तचा मोठा टप्पा पार केला आहे. यासाठी ४ हजार ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आला. महाराष्ट्रात २०१२मध्ये ५० लाख घरांत शौचालय होते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सन २०१७-१८ मध्ये राज्यात २२ लाख शौचालये बांधली. यामुळे ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्र हागाणदारी मुक्त झाला असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

अतिथी सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याची माहिती दिली आहे. दरम्यान, हागणदारी मुक्तचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.