चीनच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

नागपूर : ‘चायना रेल्वे कन्स्ट्रक्शन हेवी इंडस्ट्री को. लि.’चे उपमहाव्यवस्थापक हे आँगजून यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेतली.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित होते. मुंबई मेट्रो -३ प्रकल्पासंदर्भात चर्चा करण्यात आली. याप्रसंगी चीनच्या शिष्टमंडळाने स्मृतीचिन्ह देवून चीन भेटीचे निमंत्रण दिले.