मराठा आरक्षण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार सर्वपक्षीय गटनेत्यांशी चर्चा

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रात वणवा पेटला आहे. त्यामुळे सरकारने हा मुद्दा गंभीरतेने घेतला असून त्यासाठी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी ही बैठक बोलावली असून यासाठी विधानभवनाच्या दोन्ही सभागृहातील नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांची रात्री उशिरापर्यंत बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मॅरेथॉन चर्चा झाली. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठकीतील मॅरेथॉन चर्चनंतर ही माहिती दिली.

माझ्या टेबलावर फाईल असती तर मराठा समाजाला कधीच आरक्षण दिलं असतं : पंकजा मुंडे

मराठयांवर खापर फोडू नका, अमित शहा मुंबईत असल्यानेच मुख्यमंत्री पंढरपूरला गेले नाहीत – गायकवाड

मराठ्यांचे रौद्र रुप – कुर्डूवाडी पंढरपुर रोडवर एस.टी तोडफोड सत्र सुरुच