मोदी नंतर आता फडणवीसांना सुद्धा मनीऑर्डर

अहमदनगर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. आपली व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी अहमदनगरमधील एका शेतकऱ्याने चक्क कांदा विकून मिळालेल्या ६ रुपयांची थेट मुख्यमंत्र्यांना मनीऑर्डर केली आहे.

संगमनेरच्या अकलापूर येथील शेतकरी श्रेयस आभाळे यांनी आपल्या शेतात दोन एकर कांद्याचे पीक घेतले. त्यासाठी ठिबक सिंचनाचा प्रयोग करत अडीच लाख रुपये खर्च केले. आभाळे यांनी गुरुवारी संगमनेर बाजार समितीत आणलेल्या कांद्याच्या गोण्या गगनगिरी ट्रेडिंग कंपनी या आडतदाराकडे दिल्या असता त्यांच्याकडील चांगल्या कांद्याला २ रुपये ५१ पैशाचा, मध्यम कांद्याला ७५ पैसे आणि हलक्या कांद्यासाठी ६३ पैसे किलोचा भाव मिळाला. ५१ गोण्या विकून ३ हजार २०८ रुपये त्यांच्या हातात पडले.

Rohan Deshmukh

हा कांदा उतरवण्यासाठी, हमाली वजन करण्याचा खर्च, वाहतुकीचा खर्च आणि वारई यावर त्यांचे ३२०२ रुपये खर्च झाले. बाजारात विक्रीसाठी आणलेल्या कांदा विक्रीतून त्यांच्या हाती फक्त सहा रुपये शिल्लक राहिले. संतापलेल्या आभाळे यांनी या सहा रुपयांची मनीऑर्डर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. तसेच, फडणवीस यांनी या सहा रुपयातून शेतीविषयक पुस्तके खरेदी करून शेतीचा अभ्यास करण्याचा अजब सल्लादेखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

दरम्यान, यापूर्वी ही नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील संजय साठे या शेतक-याला कांदा विक्रीतून मिळालेली तुटपुंजी रक्कम त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे मनीऑर्डर करून पंतप्रधान दुष्काळ निवारण निधीला मदत म्हणून पाठवली होती.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...