सिद्धिविनायकचा अध्यक्ष असेपर्यंत तरी नीट वागावं ; मुख्यमंत्र्यांनी बांदेकरांना झापलं

टीम महाराष्ट्र देशा : पराभव समोर दिसू लागल्याने शिवसेनेने स्तर सोडला. माझी क्लिप ऐकून मला आनंद झाला. पूर्ण क्लिप ऐकवली असती तर लोकांसमोर यांना जाता आलं नसतं. क्लिपची मोडतोड करण्यात आली आहे. मी कार्यकर्त्यांना कुठेही या नीतीचा वापर करण्याचा संदेश दिला नाही. मी बोलल्या वक्तव्यापैकी काहीही चुकीचं बोललो असेल तर माझ्यावर कारवाई करा. मात्र निवडणूक आयोगाने ज्यांनी हि एडीट करून क्लिप वाजवली त्यांच्यावरही कारवाई करा अशी मागणी आज मुख्यमंत्री देवेंद्र यांनी केली आहे.

दरम्यान, “आदेश बांदेकर यांनी क्लिप दाखवली अरे सिद्धिविनायकचा अध्यक्ष आहेस अध्यक्ष असेपर्यंत तरी नीट वागावं पण तो छोटा माणूस तो आदेशानुसारच वागणार” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे नेते आदेश बांदेकर यांना झापलं आहे.

भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक होत असून, भाजप आणि शिवसेनेसाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपकडून काँग्रेसमधून आयात केलेले राजेंद्र गावित हे उमेदवार देण्यात आले आहेत. तर शिवसेनेकडून भाजपमधून शिवसेनेमध्ये गेलेले श्रीनिवास वनगा हे उमेदवार आहेत. दरम्यान जसजशी निवडणूक जवळ येत आहे तशी प्रचारातली रंगत वाढत असून, आरोप प्रत्यारोपाचं राजकारण रंगतांना दिसत आहे.

दरम्यान, शुक्रवारी याठिकाणी झालेल्या जाहीर सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सनसनाटी ऑडिओ क्लीप उघड केलीये. या क्लीपच्या सतत्येविषयी अद्याप पडताळणी करण्यात आलेली नाही. मात्र, या क्लीपमुळे शिवसेना आणि भाजपमध्ये वाद निर्माण झाला आहे.