विरोधक घाबरले आहेत म्हणून मुद्दामहून संशयाचे वातावरण निर्माण करीत आहेत-मुख्यमंत्री

blank

टीम महाराष्ट्र देशा : आज शेतकरी नैसर्गिक आपत्ती, योग्य हमीभाव, पुरेशा सोयी-सुविधांअभावी अडचणीत सापडला आहे. चांगले उत्पादन मिळूनही शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. त्यामुळे शेतीमालाला योग्य हमीभाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन होणार आहे. तरीही आज शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे विरोधक राजकारण करीत आहेत. आधीच्या सरकारने फक्त शेतकऱ्यांच्या नावावर तिजोऱ्या  भरण्याचे काम केले अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधीपक्षांवर केली आहे.

स्वामीनाथन आयोग २००४ मध्ये आला. त्यावेळी मनमोहनसिंग पंतप्रधान होते. तर शरद पवार कृषीमंत्री होते. २०१४ पर्यंत त्यांची सत्ता असतानाही त्यांनी याबाबत का निर्णय घेतले नाहीत, त्यांना वाटते स्वामीनाथन आयोग आपण लागू करू शकलो नाही. हे सरकार तर कुठले करणार ? परंतु पंतप्रधान मोदी यांनी शेतीमालाच्या उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यामुळे विरोधक घाबरले आहेत म्हणून ते मुद्दामहून संशयाचे वातावरण निर्माण करीत आहेत. अस सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले आहेत. सांगली जिल्हा कृषी महोत्सव व दख्खन यात्रेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.