दत्तक घ्यायला मनगटात ताकद लागते, मुख्यमंत्र्यांचा पवारांवर पलटवार

टीम महाराष्ट्र देशा : नाशिक जिल्हा दत्तक घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. आता मी दत्तक शब्द उच्चारला की अनेकांच्या पोटात दुखते. दत्तक घ्यायला मनगटात ताकद लागते असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांवर पलटवार केला आहे.

नेमकं काय म्हणाले शरद पवार ?

काहींनी सांगितले की मी नाशिक जिल्हा दत्तक घेतो, मला गंमत वाटली…आम्हाला बाहेरचा दत्तक लागत नाही…दत्तक बापाच्या जोरावर आम्ही घर चालवत नाही, स्वकष्टाने चालवतो…स्वकर्तृत्वाने घर चालवणारे आम्ही लोक आहोत…आम्हाला माहित होते की हे दत्तक विधान काही टिकणार नाही…आपल्याला दत्तक बापावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.